🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

https://shriniwasjrcollege.wordpress.com/

 

संस्थेविषयी

श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालयाची वैशिष्ठे..

  • शहरालगत प्रशस्त इमारत.
  • क्रीडांगण व क्रीडा साहित्य.
  • गरजे नुसार प्रोजेक्टर चा वापर.
  • इ-लर्निगची सुविधा - सर्व विषयाचे सॉफ्टवेअर, सि. डी.उपलब्ध.
  • ग्रंथालयात विविध मासिके व दैनिकांची उपलब्धता. 
  • विद्यार्थी केंद्रबिंदू मानून - प्राध्यापक,पालक व प्रशासक यांच्यात सुसंवाद.
  • प्रयोगशाळा ,स्वतंत्र अभ्यासिका .
  • JEE व NEET ची संपूर्ण तयारी.
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.
  • उच्च शिक्षित प्राध्यापक .


           https://shriniwasjrcollege.wordpress.com/




प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे...

प्रवेश अर्जासोबत खालील मुळ प्रमाणपत्र व प्रत्येकाच्या दोन प्रमाणित छायांकित प्रती सादर कराव्यात.


1) गुणपत्रिका.


2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी.सी.)


3) वर्गीकृत अनुसूचित जाती जमातीचा दाखला.(caste    certificate)(फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी)


4) शैक्षणिक खंड पडला असेल तर 100 च्या स्टॅम्प पेपर वर हमीपत्र.


5) पासपोर्ट साईज फोटो .


6) आधार कार्ड.



शिष्यवृत्ती व फी माफी...

  • शिष्यवृत्ती व फी माफी साठी विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजे.
  • 1) एका पेक्षा जास्त सवलतीचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार नाही.
  • 2) विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित असले पाहिजे.
  •  3) विद्यार्थ्याचा अभ्यास व वर्तणूक समाधानकारक आली पाहिजे.
  • 4) पूर्व परवानगीशिवाय अनुपस्थित राहिल्यास त्याची अनुपस्थिती शिस्त्तभंग समजली जाईल.
  • 5) उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व घटक चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा आदी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • 6) शिष्यवृत्तीचा व ई. बी.सी. चा फॉर्म अचूक व वेळेवर भरून देणे  ही विद्यार्थ्याची जिम्मेदारी राहील.
  • खालील प्रमाणे निरनिराळ्या शासकीय योजना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
  • 1) ई. बी. सी. फी माफी.
  • 2) प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मिळणानारी फी माफी.
  • 3) मागास वर्गीयांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती.
  • 4) अल्प संख्यांक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद शिष्यवृत्ती.
  • 5) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना संबंधित खात्याकडून मंजुरी  मिळाल्यावर शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरताना खालील प्रमाणपत्राच्या दोन प्रमाणित टंकलिखित किंवा झेरॉक्स प्रती फॉर्म सोबत सादर करणे आवश्यक आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती करिता  संबंधितांनी आवेदन पत्र ऑनलाईन भरावे.
  • 1) टी. सी.(सत्यप्रत)
  • 2) गुणपत्रिका (सत्यप्रत)
  • 3) मा.तहसीलदार साहेबांचे  उत्पन्नाचे प्रमाणपत्र(मुळ)
  • 4) जातीचे प्रमाणपत्र (सत्यप्रत)
  • 5) स्वीकृती पत्र.
  • 6) फोटो 2.

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी