Posts

Showing posts from July 29, 2023

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

"पालक व मुले यांची शिक्षणाविषयीची मानसिकता"

    "असं शिक्षण शिक्षण       जसं वाघीणीचं दूध       इथं नाही उच्च नीच      किती भाग्याचं लक्षण "     ह्या ओळीच्या आधारावर आज समाजात शिक्षणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे.शिक्षणाची क्रांती झाली पाहिजे,असे प्रत्येकाला वाटत असते.शिक्षणामुळे माणसाची प्रगती वाढत चाललेली दिसून येते.भारतीय समाज व्यवस्थेत शिक्षणामुळे परिवर्तन झालेले आढळून येत आहे,परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.शिक्षणामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.शिक्षण हे माणसाला अंधारातून प्रकाशात घेऊन जाते.कोणत्याही व्यक्तीला जर शिक्षण नसेल तर डोळे असून आंधळा.आजच्या विज्ञानाच्या युगात शिक्षण नसेल तर व्यक्तीला महत्त्व नाही,अशी काही पालकांची भूमिका दिसून येते.शिक्षण हे आजच्या काळातील गरज बनली आहे.शिक्षण नसेल तर समाजात मान प्रतिष्ठा मिळत नाही.सामाजिक,राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक प्रगती ही शिक्षणाशिवाय नाही असे प्रत्येक पालकांना वाटत असते.     आज झपाटयाने दिवसेंदिवस शिक्षण वाढत आहे.पण व्यक्ती हा जागीच आहे.आज प्रत्येक पालकांचे एक स्वप्...