Posts

Showing posts from May 2, 2026

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

Image
*यशाची परंपरा कायम; श्रीनिवास कॉलेज वसमत चा 85% निकाल* वसमत (प्रतिनिधी )येथील श्रीनिवास विद्यामंदिर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या (HSC) 2025-26 च्या परीक्षेत 85 टक्के इतका उल्लेखनीय निकाल नोंदवत यशाची परंपरा कायम राखली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. विज्ञान शाखेत विनायक श्रीधर लोखंडे (90%) प्रथम, श्रद्धा गजानन वारे (79%) द्वितीय, तर श्रेया दत्ता भोसले (78.17%) तृतीय क्रमांकावर राहिले. तसेच वैष्णवी लक्ष्मण जाधव (78%), कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी (76.33%), धनश्री विनायक भोरे व खुशी पंकज वैजवाडे (प्रत्येकी 75%), सिया संजय वाघिले (74.33%), प्राची अतुल पांडे (73.33%), प्रेम दिनेश गुजराथी, अवनी शशिकांत साखरे, वेदिका वैजनाथ पटवे व शेख झोया शेख अब्दुल्ला (प्रत्येकी 73%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. कला शाखेत कुशवर्ता बाबुराव तागडे (61%) प्रथम, मेमन सूनेहरा बानो मोहम्मद सलीम (60%) द्वितीय, तर प्रतीक्षा राहुल वाघमारे व गजानन गुलाबराव कदम (प्रत्येकी 59%) यांनी यश मिळ...