🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

*यशाची परंपरा कायम; श्रीनिवास कॉलेज वसमत चा 85% निकाल*

वसमत (प्रतिनिधी )येथील श्रीनिवास विद्यामंदिर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या (HSC) 2025-26 च्या परीक्षेत 85 टक्के इतका उल्लेखनीय निकाल नोंदवत यशाची परंपरा कायम राखली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
विज्ञान शाखेत विनायक श्रीधर लोखंडे (90%) प्रथम, श्रद्धा गजानन वारे (79%) द्वितीय, तर श्रेया दत्ता भोसले (78.17%) तृतीय क्रमांकावर राहिले. तसेच वैष्णवी लक्ष्मण जाधव (78%), कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी (76.33%), धनश्री विनायक भोरे व खुशी पंकज वैजवाडे (प्रत्येकी 75%), सिया संजय वाघिले (74.33%), प्राची अतुल पांडे (73.33%), प्रेम दिनेश गुजराथी, अवनी शशिकांत साखरे, वेदिका वैजनाथ पटवे व शेख झोया शेख अब्दुल्ला (प्रत्येकी 73%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
कला शाखेत कुशवर्ता बाबुराव तागडे (61%) प्रथम, मेमन सूनेहरा बानो मोहम्मद सलीम (60%) द्वितीय, तर प्रतीक्षा राहुल वाघमारे व गजानन गुलाबराव कदम (प्रत्येकी 59%) यांनी यश मिळविले. गौरव विठ्ठल कल्याणकर (58%) यांचीही कामगिरी लक्षणीय ठरली.
वाणिज्य शाखेत सेजल सोमनाथ मद्रेवार (91%) प्रथमq क्रमांकावर, तर सुमित संतोष वट्टमवार (67.33%) द्वितीय क्रमांकावर राहिले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश तुळशीराम कमळू, सचिव सौ. आरती गणेश कमळू, संचालक गौरव गणेश कमळू व श्री अरुण तुळशीराम कमळू, तसेच प्राचार्य सचिन बाबुराव लोखंडे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या



वाणिज्य शाखेत सेजल सोमनाथ मद्रेवार (91%) मार्क्स प्रथम क्रमांक 
विज्ञान शाखेत विनायक श्रीधर लोखंडे (90%) मार्क्स प्रथम क्रमांक 

Comments

Popular posts from this blog

वसमत तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत चे विद्यार्थी झळकले

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम