🕐
सुर्यग्रहण व्हिडिओ पाहा🌞🌞
- Get link
- X
- Other Apps
#सुर्यग्रहण*🌞🌞
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते. म्हणजेच *सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते*.
_पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून_ _सूर्यग्रहण दिसते._ जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते.
1) *#खग्रास_सूर्यग्रहण*
खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोनीय माप साधारण सारखेच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचे आकारमान आपल्याला एकसारखेच भासते. त्यामुळे जेव्हा चंद्र सरळ रेषेत पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवरून पाहता तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. या वेळी सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो; या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन तेथे चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) पडते. पृथ्वीवरील गडद सावलीच्या भागांतूनच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते.
2) *#खंडग्रास_सूर्यग्रहण*
खंडग्रास म्हणजे काही भाग ग्रासणे. सूर्य हा आपल्याला जवळचा तारा असल्याने तो विस्तारित प्रकाशस्रोत आहे. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन जशी चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) तयार होते, तशीच विस्तारित प्रकाशस्रोतामुळे प्रच्छायेभोवती फिकट सावली (उपच्छाया) देखील पडते. उपच्छायेमुळे खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.
*खंडग्रास सूर्यग्रहणामागे दोन कारणे असू शकतात*.
A) पृथ्वीवरील या फिकट सावलीच्या भागांतून पाहिल्यास सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो. तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला *खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात*.
B) कधी कधी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये अगदी एका रेषेत न येता थोडा वर किंवा खाली असतो. या स्थितीमध्ये चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवर पडत नाही, पण उपच्छाया काही प्रमाणात पृथ्वीवरील काही भागांवर पडते. या भागांतून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.
3) *#कंकणाकृती_सूर्यग्रहण*
चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी लंबवर्तुळाकार असल्याने, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्याफार प्रमाणात बदलत असते. याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही (कोनीय माप) बदलत असतो. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या *सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो*. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
#सूचना_एक_विनंती
*सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच*, किंवा सूर्यबिंबाचे आरसा वापरून प्रतिबंबाचे भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते.
*#आपल्याकडं_आज_खंडग्रास_सूर्यग्रहण_होते*🙂🙂🌞🌞👍👍👏👏



Comments