Skip to main content

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...


 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

January 04, 2023

पेशवाईच्‍या काळात महिला या अबला म्हणून समजल्या जात पण आज त्या सबला बनल्या आहेत. महिलेचे अस्तित्व चुलीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही ती अस्तित्व गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले दिसून येते ते केवळ एका स्त्री मुळेच म्हणजे सावित्रीबाई मुळेच म्हणावे लागेल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते 1840 मध्ये वयाच्या अवघ्या नव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे वय बारा वर्षे होते.

सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले यांच्या रूपाने एक सुशिक्षित समाज हितवादी परोकारी व समाज सुधारक पती मिळाले.महात्मा फुले हे सावित्रीबाई यांना कुठलेच अक्षर ओळख नसताना त्यांनी शिक्षणाचे धडे दिले सावित्रीबाई अक्षर गिरवायला सुरू करत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असत.

जानेवारी 1948 रोजी बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली पहिल्याच दिवशी सहा मुली शाळेत आल्या त्याकाळी मुलींना शिकवण्यासाठी कोणीही तयार होईना तेव्हा सावित्रीबाईंनी शाळेत शिकवावे असे ज्योतिबा फुले यांनी ठरवले सावित्रीबाई अक्षर गिरवायला लागल्या आणि पुढे शाळेत शिकू लागल्या सनातनांच्या छळाला न जुमानता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे हे उज्वल व यशस्वी काम करण्या-या त्या आदर्श शिक्षिका ठरल्या.त्याकाळी एका महिलेने शिक्षकाचे काम करणे म्हणजे अत्यंत समाजद्रोही व धर्मद्रोही गोष्ट समजली जायची त्यामुळे पुण्यातील सनातन्‍यांच्‍या तळपायाची आगमस्तकाला गेली कलियुग आलं धर्म बुडाला अशा प्रकारचे शब्द सावित्रीच्या कानावर पडत.

भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका भारतीय स्त्री मुक्तीच्‍या आणि स्त्री शिक्षणाच्‍या प्रणेत्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई ह्या पहिल्या विद्या ग्रहण करणाऱ्या महिला आहेत यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हणतात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातलं सावित्रीबाई फुले शाळेत जाताना उच्च वर्गातील पुरुष वर्ग हा त्यांना एका वेगळ्या नजरेने पाहत असत त्यांना शाळेत जाताना चिखल दगड शेण माती त्यांच्या अंगावर टाकली जायची पण त्या ते निमुटपणे सहन करत असत अंगावरची साडी खराब होत असत तेव्हा ते दुसरी साठी सोबत नेत असत व बदलत असत त्या कोणालाही काहीही बोलत नसत त्यांनी आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाच त्यांनी सामना केला आणि स्‍त्री शिक्षणाची ज्योत आपल्या मनात शेवट ठेवली.

केशवपण बालविवाह विधवा विवाह प्रथा बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केल्यावर त्यांनी स्वतःच्‍या मुलांप्रमाणे सर्व बालकांची सेवा केली स्वतःला बोचणारे आपत्तीहीनपणाचे दुःख पळून लावण्यासाठी त्यांनी यशवंत नावाच्या मुलास दत्तक घेतले सावित्रीबाई फुले यांनी पुनर्विवाहासाठी संघर्ष केला महिलांच्या शिक्षणासह विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले 1954 मध्ये विविध विधवांसाठी आश्रम बांधले श्री बालहत्या रोखण्यासाठी स्‍त्री नवमाता मुलांसाठी एक आश्रमही उघडले आज देशात स्त्रीभ्रूणहत्येला वाढता कल त्या काळात स्त्री बालभारतीच्या समस्यावर लक्ष केंद्रित करणे आणि ते थांबविण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे होते हे समजून येते सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी काशीबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी घेतली आणि वेळेवर तिची प्रस्‍तुती केली नंतर त्यांनी तिचा मुलगा यशवंत यांना दत्तक घेतले आणि त्यांना चांगले शिक्षण दिले नंतर तो एक प्रसिद्ध डॉक्टर बनला.

आजच्या आधुनिक युगात स्त्री ही खूप मोठ्या प्रमाणात सबल बनली आहे त्यांचे सक्षमीकरण झाले आहे ते केवळ एका सावित्रीबाई मुळेच म्हणावे लागेल.

सावित्री फक्त तुमच्यामुळेच

मिळाले महिलांना ज्ञान आज

जगती होत आहे महिलांचा सन्मान

सावित्रीबाई मुळे सर्वत्र महिलांमध्ये एक नव संजीवनी निर्माण झाली आहे त्यांना एक नवचैतन्य मिळाले आहे त्यामुळे महिलांची प्रगती ही आपणास पहावयास मिळेल. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे तंत्रज्ञान अंतराळ विज्ञान खेळ सैन्‍य या सर्वच क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे.

आज महिला ह्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत जसे की पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला जागतिक बॉक्सर मेरी कोम बॅडमिंटन पटू पी.व्ही. सिंधू क्रिकटर स्मृती मंधना नेमबाजी तेजस्विनी सावंत कुस्तीपटू गीता फोगाट गायन सामग्री लता मंगेशकर पहिली महिला आयपीएस किरण बेदी सायना नेहवाल शांततेचा नोबल पुरस्कार मदर तेरेसाइंदिरा गांधी व आताच्या महिला राष्ट्रपती द्रोपदी मुर्म या सर्व महिला सावित्रीच्या लेकी आहेत आणि त्यांच्या प्रेरणेतून या महिला आपले नाव उज्वल केले आहे व आपली भूमिका पार पाडत आहेत.

आज सद्यस्थितीत एक नवीन समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या ही भयावह समस्या बनत आहे कारण पूर्वीची जी बाल हत्या होती ती आता स्त्रीभ्रूणहत्या झाली आहे जर महिलांनी गर्भातच त्या अंकुराला मारले तर ते अंकुर कसे फुलेल आणि ह्या वरील महिला ह्या महिला कश्‍या निर्माण होतील म्हणून महिलांना एकच सांगावयाचे वाटते प्रत्येक महिलेने आपल्या घरात सावित्री जन्माला यावी हीच आशा बाळगावी. जर स्त्रीभ्रूणहत्या केल्या तर आपल्या देशाचे नाव कसे उज्वल होईल हाही विचार करावा.

सावित्रीबाईच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित करीत दोन रुपयाची तिकीट काढले होते व तसेच 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे ठेवले आणि त्यांची आठवण कायम ठेवली व तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावाने विविध योजना व शिष्यवृत्ती पण मंजूर करण्यात आल्‍या आहेत.

सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण क्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी विधवाची परिस्थिती सुधारावी म्हणून बालकांच्या हत्या थांबवाव्यात म्हणून त्यांनी आश्रमाची उभारणी केली दलित आणि अस्पृश्य समाजाकरिता त्यांनी कार्य केले सावित्रीबाई कवयित्री म्हणून देखील या समाजात परिचित आहेत काव्य फुले आणि बावनकाशी सुबोध रत्नाकर हे काव्यरचना आज देखील आपल्याला पाहता येतात.

महात्मा फुलेंच्या निधनानंतर सुद्धा त्या सतत कार्य मग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्या 897 ला पुण्यात महाभयंकर अशी प्‍लेग ची साथ सुरू झाली सावित्रीबाईंनी स्वतःच्‍या जीवाची परवा न करता रुग्णांची सेवा करीत राहिल्या, अशाच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच त्यांची 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

शेवटी असे म्हणावेसे वाटते कीशिक्षणाच्या स्वर्गाचे जीने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार अशी महान थोर महिला भारतात घराघरात जन्माला यवोत व सावित्रीबाई चे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवेत हीच अपेक्षा...

अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम.....

प्रा.शेळके सुदर्शन किशनराव

श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्‍ठ महाविद्यालय

वसमतता. वसमतजि. हिंगोली.

मो. नं. 9822644781

                                                           


Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी