🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

शिक्षण क्षेत्रातील वाढता बाजार एक समस्या

 प्रा . सुदर्शन किशनराव शेळके
      श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत. ता. वसमत जि.हिगोली.
मो.न. 9822644781



भारतीय समाजात शिक्षण व्यवस्था ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शिक्षण व्यवस्थेला समाजामध्ये पवित्र मानले जाते. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थित खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती झालेली आहे हे आपणास दिसून येत आहे. शिक्षण नसेल तर डोळे असुन आंधळे पणा आहे असे बऱ्याच पालकांना वाटत असते. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी आपापल्या पद्धतीने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. अवघ्या वयाच्या चौथ्या वर्षापासून बालकांना शाळेमध्ये पाठवतात एलकेजी व अंगणवाडी यापासून त्यांच्या शाळेची सुरुवात होते. जे वय खेळायचे बागडायचे असते त्याच वयात त्यांना शिक्षणाचे ओझे लादले जात आहे. शिक्षण शिकून स वरून पुढे काहीतरी बनण्याचे स्वप्न त्यांचे आई-वडील पाहत असतात. त्यामध्येच मराठी माध्यमांच्या शाळा व तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा यामध्ये पालकांना तफावत दिसून येते. म्हणून बरेच पालक आपल्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकतात. त्या शाळेची फीस अमाप असते तरीही मुलांना शाळेमध्ये प्रवेश घेतात आणि पैसे भरत असतात तेथे शाळेची फीस म्हणजे मनमानी कारभार असतो तरीही पालक हे आपल्या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी शाळेमध्ये ऐपत नसतानाही लोकांचे कर्ज काढून कर्जबाजारी होऊन शाळेमध्ये प्रवेश घेतात. खाजगी शाळांची तर मोठमोठी दुकानेच थाटलेली पाहवयास मिळतात. आपल्या मुलांचा एखाद्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेणे म्हणजे प्रतिष्ठेची लक्षण आहे असा बऱ्याच पालकांचा गोड गैरसमज असतो. 


 दहावी पास झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण लागत असते आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. मुलांना वेगवेगळी क्लासेस लावली जातात त्यांची फीस ही अमाप असते तरीही ह्या स्पर्धेच्या युगात मुलांना शिकवणी क्लासेस लावली जातात. आणि ह्या क्लासेसचे तर जागोजागी दुकानांसारखे मॉल सारखे क्लासेस वेगवेगळ्या नावांनी थाटलेली पाहवयास मिळतात. हे एक शिक्षण क्षेत्रामधला खूप मोठा बाजार आहे असे दिसून येते. आज या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक मुलांना असे वाटत आहे की मला हे उच्च प्रतीचे क्लास लावावे लागतात हजारो मुले त्या क्लासला प्रवेश घेतात तेव्हा त्यांची फीस मनमानी घेतली जाते. 

     आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग मानले जाते आणि ह्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाची दमछाक होत असताना आढळून येत आहे. प्रत्येक जण आपले स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरत आहे. प्रत्येक आई-वडिलांना असे वाटत असते की माझा मुलगा मुलगी काहीतरी बनावेत ही अपेक्षा ठेवूनच मुलांना ग्रामीण भागातून शहराकडे शिक्षणासाठी पाठवतात. शहरी भागामध्ये मुलं आल्यानंतर आपापल्या परीने अभ्यासाला जोमाने सुरुवात करतात रात्रंदिवस अभ्यास करून पोटाला चिमटा मारून एक वेळेस चे जेवण करून जसे आहे तसे भागून आपली ध्येय साध्य करण्याचा जोमाने प्रयत्न करतात.  

  वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलं तयारी करीत असतात राज्यसेवा असो किंवा सरळ सेवा असो किंवा आयबीपीएस संघ लोकसेवा आयोग. तलाठी ग्रामसेवक. अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाच दहा जागेसाठी हजारो मुले फॉर्म भरतात त्या फॉर्म ची फिस एक हजार रुपये असते व ऑनलाइन फॉर्म भरणे त्यांची फीस वेगळी असते तरीही मुलं फॉर्म भरतात परीक्षा देतात परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात आणि त्याच पेपरमध्ये पारदर्शकपणा आढळून येत नाही. गैरप्रकार झालेला दिसून येतो त्यामुळे बरीच मुलं निराश होतात. हताश होऊन परत आपल्या गावाकडे जातात तेव्हा त्यांना अनेक समस्या उदभवत असतात. . स्पर्धेच्या युगामध्ये बरीच मुलं अपयश आल्यामुळे किंवा आता आपल्या ने काही होत नाही नीराश होऊन वाम मार्गाने जात आहेत. बेकारीला कंटाळून बेरोजगारीला कंटाळून आज बरीच तरुण-तरुणी वाम मार्गाला जात असताना पाहावयास मिळते.

 शिक्षण व्यवस्थेमुळे आज समाजामध्ये खूप मोठ्या समस्या उद्भवत असताना दिसून येत आहेत. जसे की विवाहाची समस्या. हुंड्या ची समस्या. आरोग्यदाची समस्या.  मानसिक समस्या शारीरिक समस्या अशा अनेक समस्या आजच्या बेकारी मुळे बऱ्याच युवक युतीमध्ये दिसून येत आहेत. बरेच जण बेसनाधीन होत आहेत. शिक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये विविध अशा समस्या उग्ररूप धारण करीत आहेत त्यामध्ये बेकारीची समस्या विवाहाची समस्या. रिलेशनशिप समस्या उद्भवत आहेत याला जबाबदार कोण असाही प्रश्न उद्भवत आहे. 

  आजचे युवक हे उद्याचे आपल्या राष्ट्राचे भवितव्य आहे याची जाणीव कोणालाच वाटत नाही. त्यामुळेच की काय समाजामध्ये दिवसेंदिवस दारिद्र्य उपासमार बेकारी भिकारी यासारख्या समस्या पहावयास दिसून येत आहेत. आज शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढता भ्रष्टाचार. पांढरपेशीय गुन्हा याचे प्रमाण वाढत असताना दिसून येत आहे. कारण की ज्या शिक्षण व्यवस्थेला पवित्र मानले जाते त्याच व्यवस्थेमध्ये अनेक गैरप्रकार होत आहेत जसे की एनटी ये ने नीट परीक्षेमध्ये गालबोट लागले आहे तसेच नेट परीक्षेमध्ये सुद्धा पाच पाच हजारांमध्ये पेपर फोडले आहेत त्यामध्ये गैरप्रकार होत आहेत. जर असे होत असेल तर आजच्या युवकांनी युवतीने काय करावे हाही प्रश्न गंभीर आहे. अहोरात्र मेहनत करून असा गैरप्रकार होत असेल तर शिक्षण व्यवस्थेवर आजच्या युवा पिढीने कसा विश्वास ठेवावा हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज समाजामध्ये शिक्षणाचे खूप मोठ्या प्रमाणात बाजारीकरण किंवा सौदा होत असताना पहावयास मिळत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये याचे प्रमाण वाढलेले आढळून येते

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी