Posts

Showing posts from September 23, 2026

🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

श्रीनिवास कॉलेज वसमत शालेय फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम.

Image
*शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी श्रीनिवास कॉलेज वसमत चा संघ जिल्ह्यातून प्रथम* 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23.09. 2026 रोजी वसमत येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरती  14 वर्षे,17 वर्षे व 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल च्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात आमच्या श्रीनिवास विद्यामंदिर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा 19 वर्षे वयोगटातील मुलांचा संघ तालुकास्तरावरती प्रथम येऊन जिल्हा स्पर्धेत वसमत तालुक्याचा संघ म्हणून सहभागी झाला व या ठिकाणी फायनल मॅच मध्ये हिंगोलीच्या संघाला पराभूत केले ,वसमत-6  हिंगोली-0 अशा फरकाने सामना जिंकून जिल्ह्यातून सलग दुसऱ्या वर्षी प्रथम येण्याचा मान पटकावला आहे व विभाग पातळीवर  होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी हा  संघ पात्र ठरला आहे. *यामध्ये सहभागी खेळाडू विद्यार्थी* 1.कृष्णा लक्ष्मण गायकवाड.                ...