Posts

Showing posts from October 8, 2026

🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम

Image
🏆 विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम! कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा वसमत : आज दिनांक 08/10/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व छत्रपती संभाजी नगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभाग स्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. विभागस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथील फुटबॉल संघाने पहिला सामना बीड विरुद्ध 3-0 ने जिंकला, दुसरा सामना छत्रपती संभाजी नगर सोबत 1-0 ने जिंकला व फायनल सामना परभणी सोबत अतिशय चुरशीचा ठरला त्यात 1-0 ने परभणीला धूळ चारली. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार विजयामुळे संघाची राज्यस्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडू:  1.काशीफ खा हबीब खा पठाण 2.कृष्णा लक्ष्मण गायकवाड 3.गौरव नागोराव गायकवाड 4.प्रेम विलास पानपट्टे 5.महेश विठ्ठल जाधव 6.रेहान मुर्तु...