🏆 विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम!
कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
वसमत : आज दिनांक 08/10/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व छत्रपती संभाजी नगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभाग स्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. विभागस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथील फुटबॉल संघाने पहिला सामना बीड विरुद्ध 3-0 ने जिंकला, दुसरा सामना छत्रपती संभाजी नगर सोबत 1-0 ने जिंकला व फायनल सामना परभणी सोबत अतिशय चुरशीचा ठरला त्यात 1-0 ने परभणीला धूळ चारली. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार विजयामुळे संघाची राज्यस्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडू:
1.काशीफ खा हबीब खा पठाण
2.कृष्णा लक्ष्मण गायकवाड 3.गौरव नागोराव गायकवाड
4.प्रेम विलास पानपट्टे
5.महेश विठ्ठल जाधव
6.रेहान मुर्तुजा सय्यद
7.रेहान रशीद शाहा
8.सय्यद फैजान अनवर
9.शेख आरिफ शेख दस्तगीर
10.शेख आयान शेख कलीमुद्दीन
11.शेख आयान शेख सादिक
12.शेख समीर शेख युसुब
13.जैद जैनुलाबेद्दीन कुरेशी
14.शेख सोफियान जाकेर
15.श्रीओम मनोहर नांदगावकर
16.प्रसाद काशिनाथ सातपुते 17.हर्षल मिलिंद आळसपुरे
18.समर्थ अशोक पवार
संघातील खेळाडूंनी सांघिक भावना, जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट खेळकौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले. या विजयामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोली श्री.आत्माराम बोथीकर साहेब ,संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर,सचिव सौ. आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर, अरुण कमळू सर,फुटबॉल संघटनेचे जिल्हा सचिव अजगर पटेल सर,प्राचार्य सचिन लोखंडे सर, क्रीडा संघ व्यवस्थापक प्रा.संदीप पातेकर सर, क्रीडा मार्गदर्शक प्रा.सुदर्शन शेळके सर,या विद्यार्थ्यांवर अहोरात्र मेहनत घेणारे फुटबॉल प्रशिक्षक सय्यद खिजर हाश्मी सर,सय्यद नुझेर सर,शेख परवेझ सर,सय्यद सैफ सर,मलिक खान,कैलास खराटे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा प्रेमींनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हार्दिक अभिनंदन! 💐🏆
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Comments