🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

श्रीनिवास कॉलेज उद्‌घाटन सोहळा संपन्न

 *🔅श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे नवीन स्थलांतर जागेचे आज उदघाटन संपन्न....🔅*

====================



वसमत:- वसमत येथील शैक्षणिक क्षेत्रातील एक नावाजलेले व उत्कृष्ट निकालाची परंपरा देणारे महाविद्यालय.. श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे आज नवीन जागेत माऊली नगर नांदेड रोड येथे स्थलांतर झाले असून त्याचे उदघाटन *वसमत येथील लोकप्रिय आमदार मा. राजू भैय्या नवघरे यांचे हस्ते पार पडले.

* यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. श्री तानाजी भोसले साहेब,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागोबासा बोचकरी संस्थापक सहस्त्रार्जुन नागरी सह.पतसंस्था वसमत तसेच श्री सुभाषसा लालपोतु अध्यक्ष व्यापारी महासंघ,श्री तानाजी बेंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,श्री बाळू मामा ढोरे अध्यक्ष राजू भैय्या नवघरे प्रतिष्ठान,श्री भगवानसा कुदाळे माजी नगराध्यक्ष, श्री रियाज कुरेशी माजी नगराध्यक्ष, श्री विजयसा कडतन माजी नगराध्यक्ष, श्री विष्णू बोचकरी अध्यक्ष सहस्त्रार्जुन ना.सह पथसंस्था,श्री बालाजी गुजराथी सर,सौ मंगलताई सातपुते खानापुरे उपाध्यक्ष सहस्त्रार्जुन ना. सह. पथसंस्था, सौ नीता कमळू संचालक सहस्त्रार्जुन ना. सह. पतसंस्था,श्री संजय काकडे, श्री सुभाष मस्के,श्री सचिन दगडू,श्री रत्नाकर लालपोतु, श्री वसंत चेपूरवार,सौरव जाधव जिल्हा अध्यक्ष हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस युवा तसेच विश्वस्त मंडळ गणपती मंदिर पदाधिकारी, समाजबांधव तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

*मा.आमदार राजू भैय्या नवघरे यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री गणेशसा कमळू यांनी केले.* 

तसेच इतर मान्यवरांचे सुध्दा यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश सा कमळू यांनी स्वागत केले. तसेच यावेळी सौ आरती कमळू,अरुण कमळू,गौरव कमळू,पूजा कमळू ई उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.संदीप पातेकर यांनी केले व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.



Comments

Popular posts from this blog

वसमत तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत चे विद्यार्थी झळकले

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम