🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप फुलवरे ची भारतीय सैन्यात निवड

*🌹अभिनंदन.अभिनंदन🌹*
 ====================
*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप फुलवरे ची भारतीय सैन्यात निवड....*
====================
*वसमत :- श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप मारुती फुलवरे याची भारतीय सैन्यात भरती झाल्याने आज श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत तर्फे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश कमळू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
यावेळी श्री अरुण कमळू,श्री राजेंद्र धावणे उपस्थित होते.
संदीप फुलवरे हा विद्यार्थी ने अत्यंत मेहनत करून त्यांने आपले शिक्षण पूर्ण केले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती त्याचे वडील हे गवंडी काम करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचे पालन पोषण व मुलांचे शिक्षण यातून ते करायचे त्यामुळे संदीप सुद्धा वडिलांना हातभार लावायचा व शिक्षणाकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायचा. लहानपणापासून त्याला सैन्यात भरती व्हावं असं मनोमन वाटायचं परंतु परिस्थितीमुळे अडचणी समोर यायच्या पण तो परिस्थितीचे कधीही रडगाणे गात नव्हता त्याने प्रत्येक परिस्थीतीवर मात करायची असे त्याने ठरवले होते व त्याने सैन्य भरतीची तयारी केली पहिल्याच भरतीत मेहनत केली पण त्याच्या हातावर टॅटू असल्याने त्याला अपयश आले त्याने पुन्हा तयारी केली व तो पुन्हा भरती साठी गेला पण हात फॅकचर झाल्याने पुन्हा त्याला अपयशाला सामोरे जावे लागले पण त्याने आपली जिद्द सोडली नाही त्याने पुन्हा जोमाने प्रयत्न केला जिद्दीच्या, कष्टच्या व मेहनती च्या जोरावर त्याला अखेर यश मिळाले.तो भारतीय सैन्यात भरती झाला त्याला हिमाचल प्रदेश या ठिकाणी देशा च्या सीमा रक्षक या पदावर तो रुजू झाला.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव व्हीं,उप प्राचार्य पातेकर एस,प्रा.साळवे पि .प्रा.लोखंडे एस,प्रा.शेळके,प्रा.लोखंडे एस,प्रा.धोंडी एस,प्रा.नालटे.प्रा.देलमाडे मॅडम,प्रा. हूमेरा मॅडम,सारंग सर,चव्हाण सर,भालेराव, पाटोदे प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी