🕐
वसमत येथील श्रीनिवास कॉलेज च्या व्हॉलीबॉल संघाची विभागीय पातळीवर निवड!
- Get link
- X
- Other Apps
👏🏻💐अभिनंदन...अभिनंदन..👏🏻💐
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम क्रमांकाने विजयी.*
आज दिनांक 21/09/2023 रोजी हुतात्मा बहिर्जी स्मारक माध्यमिक विद्यालय वसमत च्या मैदानावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या वसमत, हिंगोली, सेनगाव, कळमनुरी या तालुक्यातून संघाने सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा सामना श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी यांच्यात झाला, हा सामना शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने जिंकला, विजयी संघामध्ये
*ओम विठ्ठल सातपुते, आर्यन अनिल मनी, ओंकार प्रकाशसा सातपुते, साईप्रसाद प्रकाशसा सातपुते, समर्थ सुनील मज्जनवार, ओम सुनील पवार, पार्थ राजाराम गठडी, वरद राजेंद्र लालपोतू, सय्यद नदीम सय्यद नईम, वामन गणेश जाधव, प्रेम भूषण पहिलवान* या सर्व खेळाडूंनी अतिशय चांगल्या खेळीने जिल्हा स्पर्धेमध्ये यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे व बीड येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. संघाचे *मार्गदर्शक शिक्षक प्रा. संदीप पातेकर सर , प्रा.सुदर्शन शेळके सर, संघ व्यवस्थापक वैभव चव्हाण सर* यांनी काम पाहिले.
संघाच्या या यशाबद्दल श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे *अध्यक्ष- प्रा.गणेश कमळू सर, सचिव- सौ आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू, अरुण कमळू , प्राचार्य - श्रीधर लोखंडे सर* तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील विभाग पातळीवर निवड स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.💐👏🏻💐👏🏻💐👏🏻


Comments