🕐
श्रीनिवास कॉलेज वसमत चा संघ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेता
- Get link
- X
- Other Apps
👏🏻💐अभिनंदन...अभिनंदन..👏🏻💐
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी.*
आज दिनांक 23/09/2023 रोजी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने विभाग स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल बीड च्या मैदानावर घेण्यात आल्या, विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या 7 संघाने विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा सामना हिंगोली जिल्हा संघ श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व बीड जिल्हा संघ लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांच्यात झाला, या सामन्यात शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने उपविजेते पद पटकाविले विजयी संघामध्ये
*ओम विठ्ठल सातपुते, आर्यन अनिल मनी, ओंकार प्रकाशसा सातपुते, साईप्रसाद प्रकाशसा सातपुते, समर्थ सुनील मज्जनवार, ओम सुनील पवार, पार्थ राजाराम गठडी, वरद राजेंद्र लालपोतू, सय्यद नदीम सय्यद नईम, वामन गणेश जाधव, प्रेम भूषण पहिलवान* या सर्व खेळाडूंनी अतिशय चांगल्या खेळीने विभागीय स्पर्धेमध्ये यश संपादन करून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे . संघाचे *मार्गदर्शक शिक्षक प्रा. संदीप पातेकर सर , प्रा.सुदर्शन शेळके सर, कुणाल बोबडे सर ,संघ व्यवस्थापक वैभव चव्हाण सर* यांनी काम पाहिले.
संघाच्या या यशाबद्दल श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे *अध्यक्ष- प्रा.गणेश कमळू सर, सचिव- सौ आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू, अरुण कमळू , प्राचार्य - श्रीधर लोखंडे सर* तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील विभाग पातळीवर निवड स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.💐👏🏻💐👏🏻💐👏🏻


Comments