🕐
श्रीनिवास कॉलेज वसमतचा संघ जिल्हा कॅरम स्पर्धेमध्ये विजयी
- Get link
- X
- Other Apps
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिंगोली जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत बाजी मारली.
आज दिनांक 12/10/2023 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगट मुले यामध्ये 6 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी 4 विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेमध्ये विजय मिळवून आपला विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग निश्चित केला आहे.
संघातील विजयी खेळाडू 1)सय्यद नदीम 2) सय्यद दानिश 3) शेख उमेर 4) शेख रेहान तसेच संघाचे मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर सर , प्रा .सुदर्शन शेळके सर यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश कमळु सर , महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर लोखंडे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments