🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

थिमक्का बनली 8 हजार लेकरांची माय!

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 8 हजार वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज 
पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय.

थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय.

प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 8 हजार वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता.

#झाडे_लावा_झाडे_जगवा🌳🌳🌳

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी