🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

श्रीनिवास कॉलेज वसमत विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय

 *🌹अभिनंदन...🌹*


*🌹अभिनंदन...🌹*


🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

*विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी.*

====================

काल दिनांक 01/10/2024 रोजी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने विभाग स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल बीड च्या मैदानावर घेण्यात आल्या, विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या 7  संघाने विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा  सामना हिंगोली जिल्हा संघ श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व बीड जिल्हा संघ लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांच्यात झाला,या सामन्यात शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने उपविजेते पद पटकाविले. विजयी संघामध्ये




*ओम विठ्ठल सातपुते,आर्यन अनिल मनी,रविकिरण अरुण पातेकर,साईप्रसाद प्रकाशसा सातपुते,समर्थ सुनील मज्जनवार,ओम सुनील पवार सक्षम सुनील बावले,आदित्य जयदीप पवार,आयुष सुनील लालपोतू,श्रीकांत संतोष चोपडे,कृष्णा राजेश लांडगु, वामन गणेश जाधव,या सर्व खेळाडूंनी अतिशय  चांगल्या खेळीने विभागीय स्पर्धेमध्ये यश संपादन करून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे . संघाचे मार्गदर्शक शिक्षक प्रा. संदीप पातेकर सर,प्रा.सुदर्शन शेळके सर,कुणाल बोबडे सर पंकज मुळे सर,संघ व्यवस्थापक वैभव चव्हाण सर* यांनी काम पाहिले.

संघाच्या या यशाबद्दल श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय चे *अध्यक्ष- प्रा.गणेश कमळू सर,सचिव- सौ आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू, अरुण कमळू ,  प्राचार्य - श्रीधर लोखंडे सर*  तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले  स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

💐🌹💐🌹💐

Comments

Popular posts from this blog

वसमत तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत चे विद्यार्थी झळकले

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम