Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

भारतीय संविधान समाजासाठी वरदान!

Image
  भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते भारताच्या  सामाजिक, राजकीय, आर्थिक, आणि नैतिक जीवनाचे मार्गदर्शक तत्व आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये रोजी संविधान सभेने ते स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आले. जात, धर्म, भाषा, पंथ, लिंग, प्रदेश अशा विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात एकता, समानता, स्वातंत्र्य, आणि बंधुता टिकून ठेवणे हे संविधानाचे प्रमुख उद्दिष्टे आहे. त्यामुळे भारतीय समाजाच्या संरचनेत आणि विकासात संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.    भारतीय समाज हा विविधतेने नटलेला समाज आहे. येथे विविध धर्म, भाषा, जाती, पंथ, प्रथा परंपरा असुन ही, विविधतेत एकता, नांदत असल्याचे आपणास दिसून येते. भारतीय समाज हा बहुधर्मीय समाज आहे. भारतात खूप मोठ्या प्रमाणात सहिष्णुता आढळून येते.  या विविधतेसोबतच सामाजिक विषमता, जातीय भेदभाव, आर्थिक विषमता, स्त्री पुरुष असमानता आणि ग्रामीण शहरी तफावत अशा समस्या देखील भारतीय समाजात दीर्घ काळापासून अस्तित्वात आहेत. या सर्व समस्यावर मार्ग काढण्यासाठी आणि न्याय प्रणाली सशक्त करण्यासाठी भारतीय संविधानाने महत्त...

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी

Image
*🌹अभिनंदन🌹*        *🌹अभिनंदन 🌹* ==================== ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी ==================== वसमत: आज लागलेल्या निकाल MHT ..CET ( PCM Group )परीक्षेत *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा विद्यार्थी श्री विठ्ठल श्रीरामसा सातपुते यांचे *चिरंजीव ओम विठ्ठलसा सातपुते यास PCM Group मध्ये 99.688 Percentile मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे* मिळालेल्या या यशा बद्दल *ओम विठ्ठलसा सातपुते यांचे खूप खूप अभिनंदन* 💐🌹💐🌹💐🌹

गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

Image
 👏👏👏👏👏👏👏👏 श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चे 12 वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.  महाविद्यालयाचा एकूण निकाल 95% गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. फेब्रुवारी/ मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीच यश संपादन केले आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून.. 1) प्रथम - पवार ओम सुनील - 84.50% 2) द्वितीय - पठाण माहीम फातेमा मुख्तार खान 82.50% 3) तृतीय - अलमास गोहर मोहम्मद अकील 82%  4) चौथा - भातांब्रे अल्फिया इस्माईल 80.67%  5) पाचवा - गुडेवार ऋतुजा शशिकांत 79.50% 6) पैंजणे नंदिनी मंगेश 79.17% 7) नाझ सिद्दिकी मोईद सिद्दिकी 78.33% 8) महविन बेगम शेख इल्यास 78% 9) गठडी मंथन नरेंद्र 77.60%, 10) कनगिरे स्नेहल भुजंग 77.17%  11) दाभाडे साक्षी प्रल्हाद 75.50% 12) शिंदे प्राची चंद्रशेखर 75.33% 13) राखेवार प्रियंका गोपाल 74.50% 14) जाधव वामन गणेश 74.17% 15) घोरपडे करुणा किशनराव 74.17% 16) अन्वेकर स्वानंदी विनायक 73.67% 17)बरिदे आदिती दिलीप 73.50% 18) घोडेकर मधुरा सुदर्शन 73.50% 19) र...

महिलांच्या शिक्षणाची माता

Image
  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले भारतीय समाज  व्यवस्थे मध्ये स्त्री पुरुष विषमता पहावयास मिळते लिंगभेदाच्या आधारावर समाजामध्ये भेदभाव केला जातो. भारतीय समाजा हा रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान व वर्णव्यवस्था या बुरसटलेल्या विचार श्रेणी वर आधारित  होता. भारतीय समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात असे. स्त्री हे परक्याचे धन आहे, तिचा शिकून समाजासाठी काही उपयोग होणार नाही .ही मानसिकता पुरुषी वर्गाची होती. तिचे अस्तित्व चूल आणि मुल एवढ्या पुरतेच मर्यादित होते. पण आता तिचे अस्तित्व एवढ्या पुरतेच मर्यादित राहिले नाही. तर तिचे अस्तित्व गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत तयार झाले  आहे. ते केवळ एका स्त्रीमुळे च म्हणावे लागेल ती स्त्री म्हणजे सावित्रीबाई होय.    ज्ञान ज्योती सावित्रीबाईचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मी बाई असे होते, 1840 मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई चा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे वय 12 वर्ष होते.   सावित्...

श्रीनिवास कॉलेज वसमत विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय

Image
  *🌹अभिनंदन...🌹* *🌹अभिनंदन...🌹* 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 *विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी.* ==================== काल दिनांक 01/10/2024 रोजी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने विभाग स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल बीड च्या मैदानावर घेण्यात आल्या, विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या 7  संघाने विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा  सामना हिंगोली जिल्हा संघ श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व बीड जिल्हा संघ लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांच्यात झाला,या सामन्यात शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने उपविजेते पद पटकाविले. विजयी संघामध्ये *ओम विठ्ठल सातपुते,आर्यन अनिल मनी,रविकिरण अरुण पातेकर,साईप्रसाद प्रकाशसा सातपुते,समर्थ सुनील मज्जनवार,ओम सुनील पवार सक्षम सुनील बावले,आदित्य जयदीप पवार,आयुष सुनील लालपोतू,...

असा हा शिक्षक दिन

Image
  रिटायर झालो पण पर्मनंट नाही झालो....... प्रा . शेळके सुदर्शन किशनराव     श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत. ता. वसमत जि.हिगोली . मो.न. 9822644781       असा हा शिक्षक दिन 5. सप्टेंबर हा दिवस शिक्षक दीन म्हणून सर्व शाळा व कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या दिवशी एक प्रकारे शिक्षकांचा सनच म्हणावा लागेल. कारण वेगवेगळ्या पोशाखा मध्ये रंगी बेरेगी पोशाखा मध्ये शिक्षक त्या दिवशी शाळेत उपस्थित राहतात व विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा चा वर्षाव स्विकारतात त्यांना सर म्हणले की एक आदराची भावना निर्माण होते. सर या शब्दाने तो भाराऊन जातो.   शिक्षक म्हणजे .  शि... म्हणजे... शिस्तप्रिय.  क्ष... म्हणजे क्षमाशील.. क... म्हणजे कर्तव्य दक्ष   असा हा शिक्षकाचा अर्थ आहे. शिक्षका हा आपली भूमिका निभवतात विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लावणे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची निर्माण करणे व आपले जे कर्तव्य आहे ते पार पाडणे ही जबाबदारी शिक्षकांची आहे. समाजामध्ये शिक्षकाला एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. शिक्षक हा समाजा...

#बाप_मरायला_नव्हता_पायजे

Image
  चांगलं आठवतंय. होय अगदी चांगलं आठवतयं. अन् आठवतंय म्हणून स्वत:ची लाजही वाटतीये. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्या जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा. अन् पैसा कमवायची तर काही अक्कल नव्हती. म्हणून मग वडलांबरं खोटं बोलायचो अन् त्यांच्याकडून पैशे उकळायचो. बाप आमचा अडाणी. म्हणजे तसा शिकलेला. एसटीत कंडक्टर. पण, नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग, उसणंपासणं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करुन ते मला पैशे द्यायचे अन् मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो. फिरायला जायचो. पोरी फिरवायचो. एकदा तर एक पोरगी म्हणाली, ‘तुझे वडील काय काम करतात?’ तर ते कंडक्टर आहेत, हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी तिला ‘ते एसटी डेपोचे मॅनेजर आहेत’ असं सांगितलं होतं. तसं सांगितल्यावर ती मला पटली होती अन् तिला ते कंडक्टर आहेत हे कळाल्यावर ती सोडूनही गेली होती. ती गेली तेव्हा लय वाईट वाटलं होतं. पण, आता ती गेल्याचं बरं वाटतं अन् आपला बाप काय चीज होता हे आठवलं की आपण त्...